या पोस्टरमुळे शिवसेना वि. राणे संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हे, संतोष परब हल्ला प्रकरणी आ.नितेश राणे अडचणीत
मुंबई | संतोष परब हल्ला प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने भाजप आमदार नितेश राणे हे अडचणीत आले आहेत. जामीन फेटाळल्यानंतर कोकणात तसेच कणकवलीमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. या दरम्यान जामिनासाठी आम्ही उच्च न्यायालयात जाऊ असे नितेश राणे यांच्या वकिलांनी सांगितले. पोलिसांना नितेश राणे यांचा ठावठिकाणा अजूनही लागलेला नाही. त्यांचा शोध चालू आहेत.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर गिरगावमधील भाजप कार्यालयाशेजारीच आ.नितेश राणे यांचा फोटो तसेच राणे हरवले असल्याचा उल्लेख असलेला बॅनर लावण्यात आला आहे. राणे यांना शोधून काढणाऱ्या व्यक्तीस एक कोंबडी बक्षीस म्हणून दिली जाईल असा उल्लेख त्यावर करण्यात आला आहे.
न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे यांना उच्च न्यायालयात जावे लागणार आहे. आ. राणे हे अजूनही अज्ञातवासात आहेत. ते नेमके कोठे आहेत. त्यांच्या ठावठिकाणा लागत नाहीये? पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या दरम्यान, आता राणे समर्थकांना डिवचणारे बॅनर गिरगावमध्ये लावण्यात आले आहे. या बॅनरवर नितेश राणे चक्क गायब असल्याचा दावा करण्यात आला आहे. या बॅनरमुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
हे पोस्टर नेमके कोणी लावले याची माहिती मिळालेली नाही. मात्र भाजप आमदार नितेश राणे यांची ओळख सांगणारी माहिती देखील या बॅनवर लावण्यात आलीय. ही माहिती नितेश राणे यांना डिवचणारी आहे. या बॅनरमुळे शिवसेना विरुद्ध राणे हा संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर नितेश राणे यांना उच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. जामीन मिळवण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात जाणार; तोपर्यंत राणे यांना पोलिसांकडे हजर होण्याची गरज नाही, असं राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी सांगितले आहे.