आर्यन खान प्रकरणात पुरावे नाहीत, पुढील आदेश मिळेपर्यंत तपास स्थगित!

आर्यन खान प्रकरणात पुरावे नाहीत, पुढील आदेश मिळेपर्यंत तपास स्थगित!

मुंबई | ड्रग्ज ऑन क्रूझ प्रकरणातील खंडणीच्या प्रकरणाच्या तपासामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती, ती सध्या थांबवण्यात आली आहे. या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आणि कोणताही पुरावा सापडला नसल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. ड्रग्ज प्रकरणातील कथित खंडणी प्रकरणाचा तपास पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात करण्यात आला आहे अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

“मुंबई पोलिसांनी तपासासाठी विशेष चौकशी पथकाने (sit) सुमारे 20 लोकांची चौकशी केली होती. अद्याप कोणताही पुरावा न मिळाल्याने या प्रकरणाचा तपास पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात करण्यात आला आहे,” असे मुंबई पोलिसांनी सांगितलं.

या प्रकरणात अभिनेता शाहरुख खानकडून २५ कोटी रुपयांची मागणीबाबतचे संभाषण समोर आले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी खंडणी प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक स्थापन केले. त्यानंतर शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांनी केपी गोसावी, सॅम डिसूजा यांची या रकमेबाबत भेट घेतली होती, मात्र या चैाकशीनंतर तपास पुढे गेला नाही.

आर्यन खानला 2 ऑक्टोबर रोजी एनसीबीने एका क्रूझ पार्टीमध्ये ड्रग्ज आढळल्यानंतर अटक केली होती. त्याला 28 ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर करताना हायकोर्टाने त्याला दर शुक्रवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या दक्षिण मुंबई कार्यालयात हजेरी लावण्याची अट घातली होती. अलीकडेच, मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानला एनसीबीच्या कार्यालयासमोर त्याच्या साप्ताहिक हजेरीतून सूट दिली. न्यायमूर्ती एनडब्ल्यू सांबरे यांच्या एकल खंडपीठाने आर्यन खानला जामीन देताना घातलेल्या अटीत बदल केला आहे की त्याला दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजर राहावे लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.