अनिल देशमुख किंवा अधिकाऱ्यांकडून कोणतीही पैशाची मागणी नाही! सचिन वाझेंची चांदिवाल आयोगासमोर कबुली

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा मोठा खुलासा

अनिल देशमुख किंवा अधिकाऱ्यांकडून कोणतीही पैशाची मागणी नाही! वाझेची चांदिवाल आयोगासमोर कबुली

चांदिवाल आयोगासमोर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी मोठा खुलासा केला आहे. 100 कोटींची खंडणी मागितली असल्याच्या प्रकरणात आता नवीन वळण आले आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची 100 कोटींच्या खंडणीप्रकरणात चांदीवाल आयोगाकडून मंगळवारी चौकशी करण्यात आली.

सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री देशमुख यांना चौकशी दरम्यान क्लीन चीट दिली आहे असच म्हणावं लागेल. अनिल देशमुख यांनी कधीही पैशांची मागणी केली नसल्याचे वाझेने म्हटले आहे. चांदीवाल आयोगासमोर आज अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांना समोरासमोर बसवून प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा सचिन वाझे याने आपण अनिल देशमुख यांना कधीही पैसे दिले नसल्याचे आणि त्यांनी कधीही पैसे मागितले नसल्याचं स्पष्ट केले.

तसेच आपण कोणत्याही बार मालकाकडून अथवा त्यांच्याशी संबंधितांकडून पैसे घेतले नाही. तसेच देशमुख यांच्या कोणत्याही सहकाऱ्यांनाही पैसे दिले नसल्याचे वाझे याने सांगितले. त्यामुळे याप्रकरणात अनिल देशमुख यांच्यावरील आरोप निकालात निघण्याची शक्यता वाढली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीही आपल्या पत्रात या दोघांच्या माध्यमातून खंडणी गोळा केली जात असल्याचा आरोप केला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच परमबीर सिंग यांनी आपल्याकडे तसे कोणतेही पुरावे नसल्याचे म्हटले होते. याप्रकरणी ईडीने देशमुख यांचे खासगी सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांनाही अटक केली होती. आता सचिन वाझे याने आपण अनिल देशमुख यांना आपण कोणतेही पैसे दिले नसल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यावरील आरोप प्रकरण निकाली निघण्याची शक्यता वाढली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.