आयकर विभागानं पवार कुटुंबियांना टार्गेट केलंय का? फडणवीसांची प्रतिक्रिया!
अजित पवारांच्या विरोधातील आयकर विभागाच्या कारवाईवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. आयकर विभागाने पवार कुटुंबावर छापा टाकला असं बोलणं चुकीचं ठरेल, असं मत फडणवीस यांनी मांडलं आहे.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? –
“तक्रारी अशा होत्या की, या कारखान्यांच्या खरेदीच्या वेळी ज्या कंपन्यांमधून पैसा आलाय तो पैसा योग्य नाही. म्हणून याची चौकशी आयकर विभागाने केली. त्यामुळे या कंपन्यांच्या डायरेक्टर्सकडे छापा टाकण्यात आला आहे. त्यामुळे पवार कुटुंबावर छापा टाकला असं म्हणणं चुकीचं ठरेल. कारण पवार कुटुंबात अजून लोकं आहेत. ते वेगवेगळे व्यवसाय करत आहेत. त्यांच्यावर कुठलाही छापा टाकण्यात आलेला नाही. काही चार-पाच साखर कारखाने आहेत, ज्यामध्ये काही व्यवहार झाल्याची माहिती आयकर विभागाला होती. त्याच्या डायरेक्टर्सवर टाकलेले छापे आहे. याला कोणत्याही परिवाराशी जोडून पाहणं हे अयोग्य आहे.