बिग बॉस मराठी : सीझन 3 ‘गायत्री घराबाहेर कशी गेली?’ जनतेचा सवाल!

बिग बॉस मराठी : सीझन 3 ‘गायत्री घराबाहेर कशी गेली?’ जनतेचा सवाल!

बिग बॉस मराठी ३ या रियालिटी कार्यक्रमात घरातील शेवटच्या कॅप्टनचा टास्क पार पडला यामध्ये जय च्या मदतीने कॅप्टनपद मीनल शाहला मिळालं. तर नॉमिनेशन कार्यात गायत्री दातार, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, मीरा जगन्नाथ आणि सोनाली पाटील नॉमिनेटेड सदस्य ठरले. यात शनिवारी पार पडलेल्या बिग बॉस चावडीवर सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी मीरा जगन्नाथ सुरक्षित असल्याचं सांगितलं तर सोनाली गायत्री आणि जय हे असुरक्षित सदस्य म्हणून जाहीर झाले.

रविवारच्या चावडीवर प्रथम जय सुरक्षित असल्याच महेश सरांनी सांगितले. तर गायत्री दातारचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला हे तिथंच स्पष्ट झाले .कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर जेव्हा याचा प्रोमो पोस्ट केला गेला तेव्हा अनेकांनी मीरा सेफ झाल्याच्या विरोधात कमेंट्स केल्या. मीराच्या जागी गायत्री घराबाहेर कशी जाऊ शकते असा प्रश्न अनेक प्रेक्षकांनी विचारला.

अयोग्य पक्षपाती निर्णय, किमान शेवटच्या आठवड्यामध्ये तरी योग्य स्पर्धकाला वाचवा’, असं म्हटलं जात आहे. तर मीरापेक्षा गायत्री कितीतरी छान खेळली आहे, असं काही कमेंट्स मध्ये दिसतंय. ‘मीरा गेली तर मी काय बोलणार’, या महेश मांजरेकरांच्या नेहमीच्या वाक्याच्यावर असा उपरोधिक टोलासुद्धा लगावला गेलाय. काहींनी गायत्री पहिल्यापासून B टीम मध्ये खेळली पाहिजे होती असे मत व्यक्त केलं. पुढील भागात तरी मीरा घराबाहेर जावी अशी इच्छाही व्यक्त केली गेली.

बिग बॉस मराठीच्या घरात ७ सदस्य उरले असून २६ डिसेंबर रोजी कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेईल एकाच स्पर्धकाला बिग बॉस च विजेतेपद मिळेल. सध्या ग्रँड फिनालेसाठी जोरदार तयारी चालू असल्याचं वृत्त समोर येतंय. त्यामुळे पुढील आठवड्यात दोन खेळाडू बाहेर पडतील असे संकेत महेश मांजरेकर यांनी दिलेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.