नागपूर विधानपरिषद निवडणुकीत नवी खेळी काँग्रेसने ऐनवेळी उमेदवार बदलला, मंगेश देशमुखांना पाठींबा

नागपूर विधानपरिषद निवडणुकीत नवी खेळी काँग्रेसने ऐनवेळी उमेदवार बदललला, मंगेश देशमुखांना पाठींबा

विधान परिषद निवडणुकीतील अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख हे बुधवारी काँग्रेसच्या बैठकीत उपस्थित होते. देशमुख यांच्या उपस्थितीने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. काँग्रेस देशमुखांना पाठिंबा देणार अशी बातमी काल संध्याकाळी राजकीय वर्तुळात पसरली होती. काँग्रेस पक्ष नेमकी कोणती खेळी खेळतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. विधान परिषदेची निवडणूक काही तासांवर येऊन ठेपलेली असताना काँग्रेसने आपला उमेदवार बदलला आहे.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपमधून कॉंग्रेसमध्ये आलेले डॉ. रविंद्र ऊर्फ छोटू भोयर हे निवडणूक लढण्यास उत्सुक नसल्याचे कारण पुढे करीत भोयर यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसने आपला उमेदवार घोषित केले आहे. या संबंधीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीतर्फे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांना पाठवण्यात आले आहे. यामुळे कॉंग्रेसवर उमेदवार बदलण्याची नामुष्की आली की काँग्रेसची हि नवीन खेळी आहे? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

नागपूरमधील गिरीश व्यास यांच्या जागेवर हि निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या सहा जागांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यासाठी प्रत्येक पक्षाने चांगलीच कंबर कसलीये. निवडणूक आयोगाने विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. त्यानुसार 6 जागांसाठी 10 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि निकाल 14 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.