एमपीएससी परीक्षार्थींसाठी दिलासादायक बातमी ! ज्या उमेदवारांनी वयोमर्यादा ओलांडली आहे अशा उमेदवारांना एक अजून संधी!

एमपीएससी परीक्षार्थींसाठी दिलासादायक बातमी !
ज्या उमेदवारांनी वयोमर्यादा ओलांडली आहे अशा उमेदवारांना एक अजून संधी!

एमपीएससी परिक्षांसाठी अथक अभ्यास करणाऱ्या परिक्षार्थींसाठी एक आनंदाची बातमी आहे. वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना नोकरभरतीसाठी स्पर्धा परीक्षा देता येत नसल्यामुळे वयोमर्यादा वाढवण्याची मागणी होताना दिसत होती. या मागणीचा विचार करून एमपीएससी साठी एक वाढीव संधी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता सुरू असल्याने याबाबतचा जीआर 10 ते 15 डिसेंबर च्या दरम्यान काढण्यात येऊ शकतो.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून एमपीएससी व सरळसेवेच्या भरती प्रक्रिया घेणे शक्य झाले नव्हते .त्या धर्तीवर हा अत्यंत महत्वाचा आणि परिक्षार्थींसाठी नवीन उमेद देणारा निर्णय आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.