Big Boss मराठी सिझन 3 | उत्कर्षनं आत्तापर्यंत कमावलेलं गमावण्याची उत्कर्ष वर आलीय वेळ – गायत्री दातारच परखड मत
Big Boss मराठी सिझन 3 | उत्कर्षनं आत्तापर्यंत कमावलेलं गमावण्याची उत्कर्ष वर आलीय वेळ – गायत्री दातारच परखड मत
उत्कर्षच्या बऱ्याच गोष्टी गायत्रीला खटकत आहेत
बिग बॉस मराठी 3 च्या घरामध्ये आज असणाऱ्या नॉमिनेशन कार्यात 8 सदस्यांना ते घरात रहाण्यास इतर सदस्यांपेक्षा का पात्र आहेत व दूसरे सदस्य का अपात्र आहे हे नवीन आलेल्या तीनही सदस्यांना पटवून द्यायचे आहे आणि त्यासाठी घरामध्ये मोठे चर्चासत्र घडणार आहे.
या कार्यात विशाल त्याचे मीरा विषयीचे मत स्नेहासमोर मांडनार असून गायत्री तिचे मुद्दे तृप्ती देसाई ना सांगताना दिसेल. बोलताना गायत्री म्हणते की , उत्कर्ष चांगला खेळाडू असला तरी त्यांच्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या खटकतात. त्यातील एक म्हणजे तो काही चुकीच्या लोकांबरोबर खेळून व त्यांच्या मागे जाऊन स्वत:पण निगेटिव्ह दिसत आहे. महेश मांजरेकरांनी पण तोच घरातील बुगुबुगू असल्याचं सांगितलं आणि ‘अ’ ग्रुप बरोबर राहिल्यावर काय होतं याचा मला चांगलंच अनुभव आला आहे, तेच आता उत्कर्ष सोबत घडत आहे त्यामुळे तो जर आत्ताच जागा झाला नाही तर आतापर्यंत जे काही त्याने कामावले आहे ते तो सगळं गमावून बसेल असे मला वाटते.