भगव्याची शपथ घेणारे आता वेगळ्या लोकांच्या संगतीत फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

भगव्याची शपथ घेणारे आता वेगळ्या लोकांच्या संगतीत फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. शिवाजीनगर येथील पक्षाच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात बोलताना फडणवीस म्हणाले, “आजकाल मला भाजपच्या भगव्याचा विशेष उल्लेख करावा लागतो कारण ज्यांनी भगवा गहाण ठेवला आहे ते स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांसोबत बसले आहेत. वीर सावरकरांची दररोज बदनामी करत आहे.

“संसदेत माफी मागायला सांगितल्यावर आपण सावरकर नसल्याचे सांगणाऱ्या निलंबित खासदारांच्या यादीत शिवसेनेच्या दोन खासदारांचाही समावेश होता हे पाहून मला धक्काच बसला,” असं फडणवीस यावेळी म्हणाले.

येणाऱ्या काळात पुणे महानगरपालिकेवर भाजपचा भगवा आणि आरपीआयचा निळा फडकल्या शिवाय राहणार नाही. आता मला भाजपाचा भगवा असे स्पेसिफिक पद्धतीने सांगावं लागत आहे. कारण भगव्याची शपथ घेणारे आता अशा लोकांच्या संगतीत आहे, ज्यांना भगव्याचा मानही नाही आणि सन्मानही नाही. ते लोक स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत,’ अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

भारतीय जनता पक्षाने (भाजप) शुक्रवारी शिवाजीनगर येथे त्यांच्या नवीन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यासह शहरातील शेकडो कार्यकर्त्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.