रस्ता तुटला पण नारळ नाही फुटला.. १.२५ कोटींचा रस्त्याच्या कामाचं उद्घाटन

रस्ता तुटला पण नारळ नाही फुटला.. १.२५ कोटींचा रस्त्याच्या कामाचं उद्घाटन

उत्तर प्रदेश मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिजनौरमध्ये रस्त्याच्या उद्घाटनासाठी भाजप आमदारांनी रस्त्यावर नारळ फोडला. परंतु या दरम्यान रस्ता तुटला पण नारळ काही फुटला नाही १.२५ कोटींच्या रस्त्याचे उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी हि घटना घडली.

रस्ते बांधणीदरम्यान किती निकृष्ट काम केले जाते आणि किती दर्जेदार रस्ते केले जातात, याचे हे जिवंत उदाहरण उत्तर प्रदेशच्या बिजनौरचे प्रकरण गुरुवारी उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले. उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये तीन किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात आला होता. स्थानिक आमदार सुची मौसम चौधरी यांना उद्घाटनासाठी बोलावण्यात आले होते. गुरुवारी उद्घाटनासाठी आमदार तेथे पोहोचल्या. आपल्या इथे प्रत्येक शुभ कार्यासाठी नारळ वाढवला जातो. अशा स्थितीत रस्त्याच्या उद्घाटनासाठी आमदारांनी नारळही रस्त्यावर फोडला, पण हे काय? नारळ रस्त्यावर फोडताना रस्ता तुटला पण नारळ काही फुटला नाही.

बिजनौरमध्ये या रस्त्याचे बांधकाम पाटबंधारे विभागाने भाड्याने केले होते. या रस्त्याच्या कामासाठी सुमारे 1.25 कोटी रुपये खर्च करण्यात आले, मात्र एका नारळामुळे या रस्ता बांधकामाचे वास्तव समोर आले. इकडे रस्ता फुटला आणि नारळ मात्र फुटलाच नाही त्यामुळे आमदारही आश्चर्यचकित झाले. त्यामुळे रस्त्याच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचं उद्घाटनाच्या कार्यक्रमातच समोर आलं. त्यामुळे या रस्त्याच्या बांधकामाची चौकशी होण्याची शक्यता आहे.

त्यानंतर ग्रामस्थांनी रस्त्याच्या बांधकामाच्या चौकशीची मागणी केली. ग्रामस्थांची बैठक झाली. त्यांनी झालेल्या प्रकाराची माहिती डीएम उमेश मिश्रा यांना दिली. मिश्रा यांनी आमदारांकडून माहिती घेत पीडब्ल्यूडीच्या नेतृत्त्वाखाली एक समिती स्थापन केली. या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन मिश्रा यांनी दिलं.

Leave A Reply

Your email address will not be published.