देशातील फॅसिझम विरोधात भक्कम पर्याय उभा केला पाहिजे, शरद पवारांच्या भूमिकेशी आम्ही सहमत – ममता बॅनर्जी

राष्ट्रीय राजकारणावर ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यामध्ये मुंबईत बैठक

देशातील फॅसिझम विरोधात भक्कम पर्याय उभा केला पाहिजे, शरद पवारांच्या भूमिकेशी आम्ही सहमत – ममता बॅनर्जी

मुंबई | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये आज सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या आणि राष्ट्रीय पातळीवर या बैठकीची चर्चा सुरू होती.

या बैठकीत भाजपाविरोधी आघाडीच्या संदर्भात ममता बॅनर्जींनी शरद पवारांशी चर्चा केली. २०२४च्या निवडणुकांच्या अनुषंगाने या दोन्ही राजकीय नेत्यांमध्ये चर्चा झाली. या बैठकीनंतर शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

या बैठकीनंतर शरद पवारांनी ममता बॅनर्जींना भेटून आनंद झाला असे ट्विट करून मुंबई दौऱ्याविषयी त्यांचं अभिनंदन केलं.

उद्धव ठाकरे यांना प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना भेटू शकले नाहीत. मात्र, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा होईल अशी प्रार्थना मी करत आहे. असे ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या.

लोकशाही मूल्यांचे संरक्षण व लोकांच्या भल्यासाठी सामूहिक प्रयत्न व लोकशाही बळकट करण्याची गरज आहे यावर आम्ही सहमत झालो. चालू असलेल्या फॅसिझम विरोधात एक भक्कम पर्याय उभा करणे गरजेचं आहे. सर्वांनी मिळून काम केल्यास भाजपचा पराभव करणे सोपं होईल असे मत ममता बॅनर्जी यावेळी बोलताना मांडले.

Leave A Reply

Your email address will not be published.