नारायणगाव बायपास संबंधित प्रश्नांसंदर्भात खा.अमोल कोल्हे यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट
नारायणगाव बायपास संबंधित प्रश्नांसंदर्भात खा.अमोल कोल्हे यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट
शिरुर लोकसभा मतदारसंघातील पुणे नाशिक महामार्गाच्या रखडलेल्या प्रश्नांसंदर्भात खा.अमोल कोल्हे यांनी आज केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली.
पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चाकण परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा विचार करता निविदा प्रकिया पूर्ण झालेल्या मोशी ते चांडोली या टप्यातील रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली. त्यानुसार गडकरी साहेबांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत संबधित विभागांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या.
त्याचप्रमाणे नारायणगाव बायपासच्या संदर्भातील खोडद रोड व पाटे खैरे मळा अंडरपासच्या कामाला तातडीने मंजुरी मिळावी अशी मागणी खा.कोल्हे यांनी गडकरींना केली आहे. या संदर्भात गडकरींनी त्वरित बैठक घेण्याचे निर्देश स्वीय सहाय्यक संकेत भोंडवे यांना दिले आहेत. लवकरच हि बैठक होईल व नारायणगाव बायपासचे प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास खा.अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.