आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मतदारसंघाविषयी! आज महाराष्ट्रात ४८ खासदार आहेत. सर्वसामान्यपणे ५-६ विधानसभा मतदारसंघांचा एक लोकसभा मतदारसंघ असतो. त्यामुळे आपल्याला वाटन स्वाभाविक आहे की लोकसभा मतदारसंघच खूप मोठा असतो! पण मित्रांनो, तसं नाहीये! नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार असे ५ जिल्हे आणि त्यातील एकूण ५४ तालुके असा अवाढव्य मतदारसंघ म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघ आणि या मतदारसंघात जवळपास ४००० हून अधिक गावे आहेत.
आता इतक्या बलाढ्य मतदारसंघात सातत्याने सहज जनसंपर्क ठेवणं तसं कठीण काम.. कारण इथे दांडगा जनसंपर्क ठेवण्यासाठी फक्त चांगली गाडी असून चालत नाही, त्यासाठी लागते प्रबळ इच्छाशक्ती ! ती प्रबळ इच्छाशक्ती डॉ. सुधीर तांबे यांच्याकडे होती आणि आपल्या वडिलांचा तोच स्वभाव आणि वारसा घेऊन सत्यजीत तांबे इथे आता काम करत आहेत. ८ फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांनी विधान परिषद सदस्य म्हणून शपथ घेतली, त्याला आज १ वर्ष पूर्ण झाले. पण एक प्रगत विकासाचा दूरदर्शी दृष्टिकोन ठेवून अव्याहतपने काम करणारे सत्यजीत तांबे या टप्प्याला वर्षपूर्ती नव्हे तर आरंभ मानतात. त्यांचा हा विचारच किती क्रांतिकारी आहे. असणारच ना, शेवटी ते स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांचे नातू आहेत आणि त्यांच्यावर लहानपणापासून तसे संस्कारआजोबांनी दिले आहेत.
नव्या पिढीचा हा युवा शिलेदार आमदार झाल्यापासून आभार दौऱ्याच्या माध्यमातून सातत्याने मतदारसंघात सक्रिय आहे. ते फक्त मतदार राजाचे आभार मानत नव्हते तर त्यांच्यासोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत होते. या समस्या जेव्हा त्यांना समजत होत्या, तेव्हा ते आपले वडील डॉ सुधीर तांबे यांच्याप्रमाणे तत्काळ त्या सोडवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू करतात.
विधी मंडळात आतापर्यंत ते ३ अधिवेशनात सहभागी झाले. या तिन्ही अधिवेशनात त्यांनी विविध प्रश्नांना वाचा फोडताना केलेली अभ्यासू मांडणी साऱ्या महाराष्ट्राने पाहिली. पहिल्या टप्प्यातच युवक जिल्हा माहिती केंद्र, अभ्यासिका आणि इतर अनेक विकासकामासाठी कोट्यवधीचा निधी खेचून आणला! त्यानंतर त्यांनी राज्यातील जनतेच्या मागण्यांना आग्रही धरत सरकार दरबारी प्रसंगी विधिमंडळात आवाज उठवला. सिन्नर तालुक्यातील MIDC कडे असणाऱ्या २६०० एकर जागेच्या प्रश्नापासून तर शिक्षकांच्या पसंतीच्या बँकेत पगाराचे खाते उघडता येणाच्या महत्वपूर्ण प्रश्न त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत मार्गी लावला. डोळसणे (ता. संगमनेर), वावी (सिन्नर) येथे Trauma Center, विदर्भ मराठवाड्यातील मागास जिल्ह्यांचा अनुशेष दूर करण्याचा विषय, योगासन क्रीडा प्रकाराचा राज्य शासनाच्या क्रीडा पुरस्कारात समावेश, मुंबईत रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी ‘पॅनिक बटण’, कंत्राटी कर्मचाऱ्यांना विमा सुरक्षा, नाशिक-मुंबई महार्गावरील वाहतूक समस्या तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनसाठी सातत्याने ते पाठपुरावा करत असून आजपर्यंत त्यांनी संबंधित खात्यांच्या मंत्री महोदयांसोबत बैठकांना देखील उपस्थिती लावली आहे.
सत्यजीत तांबे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे १०००+ शैक्षणिक शाळांना संगणक संच, ५ जिल्ह्यांमध्ये युवकांच्या कल्याणासाठी १० कोटींचा निधी, जयहिंद युथ क्लबच्या माध्यमातून वाचनालये, अभ्यासिकांसाठी १५ कोटींचा निधी, शिक्षण संस्थ्यांच्या कामांसाठी १ कोटींचा निधी, उत्तर महाराष्ट्राच्या पर्यटन विकासासाठी ७ कोटी तसेच शासनाच्या योजनांमधून विविध कामांसाठी १० कोटींचा भरगोस निधी मंजूर करण्यात आला आहे.
एवढंच नाही तर युवकांना एकाच छताखाली वाचनालय, अभ्यासिका तसेच स्पर्धा परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी सत्यजीत तांबे यांनी जयहिंद युथ क्लबच्या माध्यमातून ‘Younnovation Center’ ची अभिनव कल्पना आणली आहे. सध्या राज्यातील ५ जिल्ह्यांमध्ये तब्ब्ल ३०० ठिकाणी ‘Younnovation Center’ स्थापित करण्याचा त्यांचा मानस असून यातून राज्यातील युवकांना मोठा फायदा होणार आहे. युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पहिल्यांदाच एक लोकप्रितिनिधी या नात्याने खऱ्या अर्थाने सत्यजीत तांबे यांनी शाश्वत विचार केला आहे.