पिंपरी चिंचवड पालिकेच्या सर्वसाधारण सभेला खा.अमोल कोल्हेंची उपस्थिती
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपली तरी विरोधात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आक्रमक होत नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेच्या होत असलेल्या आजच्या महापालिका सर्वसाधारण सभेला शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अचानक हजेरी लावली. नागरिकांच्या कक्षात बसून आपले नगरसेवक सभागृहात सत्ताधारी भाजपाच्या विरोधात बोलतात की नाही हे पाहण्यासाठी डॉ. कोल्हे यांनी वॉच ठेवला.

५ तास झाले तरी विषय पत्रिकेला अजून सुरुवात नाही
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेला प्रेक्षक गॅलरीत उपस्थित आहे. आता ५ तास झाले… सभागृहात सत्ताधाऱ्यांकडून भ्रष्टाचाराची प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष कबुली दिली जात आहे. परंतु विषयपत्रिकेला अजून सुरवात नाही…कुछ तो गडबड है…!!
अशा आशयाची पोस्ट देखील डॉ.कोल्हे यांनी सोशल मीडियावर केली आहे.
महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. त्याची आचारसंहिता डिसेंबरच्या शेवटच्या किंवा जानेवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यात लागू शकते. त्यामुळे आजची सभा धरून केवळ तीन सर्वसाधारण सभा होतील.
त्यापार्श्वभूमीवर महापालिकेच्या होत असलेल्या आजच्या ऑफलाइन सर्वसाधारण सभेला शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अचानक हजेरी लावली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे हे देखील उपस्थित होते.