नातेपुते नगरपंचायतीच्या अग्निशमन इमारतीसाठी १ कोटी ९० लाखांचा निधी; आमदार राम सातपुते यांच्या पाठपुराव्यानां यश !

नातेपुते – माळशिरस तालुक्यातील नातेपुते नगरपंचायतीसाठी अग्निशमन इमारत व वाहन खरेदीसाठी प्रत्येकी १ कोटी ९० लाखांचा निधी राज्य शासनाने मंजूर केल्याचा अध्यादेश नुकताच काढला आहे. माळशिरस तालुक्यातील अकलूज, श्रीपूर-महाळुंग, माळशिरस, नातेपुते ग्रामपंचायतींचे नगरपरिषद व नगरपंचायती मध्ये रुपांतर झाल्यानंतर नातेपुते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी शहरातील आपत्कालीन सेवेचे बळकटी करण करण्यासाठी राज्य शासनांकडे महाराष्ट्र अग्नी सुरक्षा अभियानांतर्गत निधी मंजूर करण्याचा प्रस्ताव दिला होता.

तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार राम सातपुते यांनी या विषयात लक्ष घालत मंत्रालयात सातत्यपूर्ण पाठपुरावा करत नातेपुते नगरपंचायतीसाठी प्राधान्याने १ कोटी ९० लाखांचा निधी मंजूर करून घेतला. यामुळे आता शहरात आपातकालीन सुविधी देण्यात नातेपुते नगरपंचायत सक्षम बनली आहे. यामुळे शहरातील व्यापारी, नागरिक, व्यावसायिक यांना मोठा फायदा होणार असल्याने त्यांनी आमदार राम सातपुते यांचे आभार मानले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.