स्वस्तात खरेदी करा होंडाच्या कार, फेब्रुवारी महिन्यात या कारवर बंपर डिस्काउंट
जपानी कार कंपनी होंडाकडून देशात आपल्या कारवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. कंपनीकडून या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात किती डिस्काउंट दिला जात आहे, सविस्तर जाणून घ्या.
होंडाची कॉम्पॅक्ट सेडान अमेजवर कंपनी फेब्रुवारी २०२३ मध्ये ३३ हजार २९६ रुपयाचा डिस्काउंट देत आहे. कंपनीकडून या कारच्या २०२२ आणि २०२३ मध्ये बनवलेल्या यूनिट्सवर डिस्काउंट मिळत आहे. २०२२ मध्ये बनवलेल्या अमेजवर कंपनी कॅश डिस्काउंट म्हणून १० हजार रुपये किंवा एफओसी अॅक्सेसरीजवर १२ हजार २९६ रुपयाचा डिस्काउंट देत आहे. कार एक्सचेंज केल्यास १० हजार रुपये, कस्टमर लॉयल्टी बोनसचे पाच हजार रुपये आणि कॉर्पोरेट डिस्काउंट मध्ये ६ हजार रुपयाची सूट दिली जात आहे. तर २०२३ च्या यूनिट्सवर कॅश डिस्काउंटच्या पाच हजार रुपये किंवा एफओसी अॅक्सेसरीजसाठी ६ हजार १९८ रुपये शिवाय, कार एक्सचेंज, कस्टमर लॉयल्टी आणि कॉर्पोरेट डिस्काउंट समान आहे.
होंडाच्या हॅचबॅक जॅज वर कंपनी १५ हजार रुपयाचा जास्तीत जास्त डिस्काउंट देत आहे. यात कार एक्सचेंज केल्यास ७ हजार रुपये, कॅश डिस्काउंट मध्ये पाच हजार रुपये आणि कॉर्पोरेट डिस्काउंट मध्ये ३ हजार रुपयाची सूट दिली जात आहे.
कंपनीची डब्ल्यूआरव्हीच्या एसव्हीएमटी आणि व्हीएक्सएमटी वर वेगवेगळे डिस्काउंट मिळत आहे. एसव्हीएमटी वर कॅश डिस्काउंट म्हणून ३० हजार रुपये किंवा एफओसी अॅक्सेसरीज वर ३५ हजार ३९ रुपये, कार एक्सचेंज वर २० हजार रुपये डिस्काउंट शिवाय, ७ हजार रुपयाचे बोनस, कस्टमर लॉयल्टी बोनस पाच हजार रुपयाचे डिस्काउंट मिळत आहे. व्हीएक्सएमटीवर कॅश डिस्काउंट म्हणून २० हजार रुपये किंवा एफओसी अॅक्सेसरीज वर २३ हजार ७९२, कार एक्सचेंजवर १० हजार रुपये डिस्काउंट शिवाय ७ हजार रुपयाचे बोनस कस्टमर लॉयल्टी बोनस पाच हजार रुपयाचा डिस्काउंट मिळत आहे.