सोमेश्वर फाउंडेशन व डॉ. मनीषा योग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय योगासन स्पर्धेचे आयोजन

मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी योग, व्यायाम आणि प्राणायाम याचे महत्त्व पटवून देणाऱ्या स्पर्धेची दिली माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नानंतर 21 जून दिवस संपूर्ण जगभरात जागतिक योग दिन म्हणून साजरा होत आहे. योगाभ्यास आणि त्याचे शारीरिक व मानसिक फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगभरात 21 जून जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, लवचिकता आणि मानसिक स्थैर्य वाढवण्यासाठी सोमेश्वर फाउंडेशन आणि डॉ. मनीषा योग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने “शालेय योगासन स्पर्धा २०२५” चे आयोजन करण्यात आले आहे.सामाजिक व सांस्कृतिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण व त्यांचे सोमेश्वर फाउंडेशन या कार्यक्रमाचे संयोजक असून स्पर्धेचे आयोजन डॉ. मनिषा योग इन्स्टिट्यूट, ग्रामसंस्कृती गार्डन, सोमेश्वर मंदिर समोर सोमेश्वरवाडी पाषाण येथे करण्यात आले आहे. ही स्पर्धा १८,१९ व २० जून २०२५ सकाळी ७ ते ९ ते व सायंकाळी ५ ते ७ या वेळेत पार पडणार आहे.हे.ही स्पर्धा ८ वर्षाखालील,१२ वर्षाखालील व १४ वर्षाखालील अशा तीन गटात घेतली जाणार आहे.

या स्पर्धेमध्ये प्रत्येक स्पर्धकास किमान पाच योगासने सादर करावी लागणार आहेत. यामध्ये तीन आसने ही परीक्षकांच्या निवडीने व दोन आसने ही स्पर्धकाच्या निवडीने सादर करायची आहेत.
या स्पर्धेचे प्रशिक्षण हे सुप्रसिद्ध योगतज्ञ डॉ. मनीषा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. त्यांना योग व आहार शास्त्रातील प्रदीर्घ अनुभव असून डॉक्टर मनीषा योग इन्स्टिट्यूटच्या त्या संस्थापिका आहेत.

यावेळी माहिती देताना स्पर्धेचे संयोजक सनी विनायक निम्हण यांनी सांगितले , “शालेय विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त, शारीरिक व मानसिक संतुलन यासाठी योग हे प्रभावी माध्यम असून, या उपक्रमातून आम्ही त्यांना एक सकारात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत!” तरी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.