पुणे : सोमेश्वर फाउंडेशनच्यावतीने १० व्या जागतिक योग दिनानिमित्त विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. योगाभ्यासामुळे मानवी जीवनात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते. सद्यस्थितीमध्ये योगसाधनेला आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनवणे गरजेचे झाले आहे. आरोग्यमय जीवन जगण्यासाठी योगमय जीवनाला सुरुवात करणे गरजेचे आहे याच भावानेतून या विशेष योग शिबीरचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पुणे मनपाचे माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी दिली आहे.
पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी योगाचे महत्व सांगत २१ जून हा जागतिक योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत सादर केला होता. तेव्हा २०१४ सालापासून योगाभ्यास आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगभरात दरवर्षी २१ जून रोजी ‘जागतिक योग दिन’ साजरा केला जातो. यंदा याचे दहावे वर्ष आहे. प्रत्येक वर्षी एक विशेष उद्देश ठेऊन योग दिन साजरा केला जातो. मागील वर्षी ‘वसुदैवम कुटुंबकम’ ही संकल्पना राबविण्यात आली होती तर यंदा ‘self and Society’ या संकल्पनेवर योग दिन साजरा केला जाणार आहे.
जागतिक योग दिनानिमित्त मा. नगरसेवक सनी निम्हण हे प्रत्येक वर्षी विशेष योग शिबिराचे आयोजन करत असतात याची पुणे शहरात चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. कारण दरवर्षी वेगळी संकल्पना, सूक्ष्म नियोजन करण्यात ते पारंगत आहेत. म्हणूनच पुणे शहरातील नागरिकांना देखील सनी निम्हण यांच्या उपक्रमांची आवर्जून वाट पाहात असतात.
या शिबिरात योग प्रशिक्षक मनिषा सोनावणे या योगाभ्यासाबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहत विशेष योग शिबिराचा अनुभव घ्यावा असे आवाहन सनी निम्हण व सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.