सुंबुलने केला घात! फिनाले आधी दाखवले रंग, शिव ठाकरेच्या ‘मंडळी’ला पाडलं एकटं

बिग बॉस शेवटच्या टप्प्यात असतानच सुंबुल तौकीर खानने मारली पलटी, आपल्याच जवळच्यांचा पाठीत खुपसला खंजीर

बिग बॉस 16 च्या महाअंतिम सोहळ्याला अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे स्पर्धकांच्या मनातील धडधड वाढली आहे. अशातच या शनिवार रविवारी पार पडणारे एलिमिनेशन सर्वात महत्वाचे असणार आहे. सध्या अर्चना गौतम, प्रियांका चहर चौधरी, शालीन भानोत आणि निमृत कौर अहलुवालिया बिग बॉस 16 च्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचल्या आहेत. तर या आठवड्यात एमसी स्टॅन, शिव ठाकरे आणि सुंबुल हे नॉमिनेट झाले आहेत.

शोमध्ये शिव ठाकरेच्या चेहऱ्यावरचा ताण स्पष्टपणे दिसत आहे. तर खेळाच्या या टप्प्यावर मला घरी जायचे नाही असे स्टॅनचे म्हणणे आहे. या संपूर्ण नॉमिनेशन कार्यात सुंबुल तौकीरने बराच वेळ घालवला. खरंतर सुंबुलमुळेच स्टॅन आणि शिव टास्क हरले आणि नॉमिनेट झाले. त्यानंतर खुद्द बिग बॉसनेही शिव आणि स्टॅनला सावध राहण्याचा इशारा दिला आहे. अशातच सुंबूलही त्यांच्यावर नाराज आहे. दरम्यान, सुंबूलच्या संभाषणाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

गेल्या एपिसोडमध्ये बिग बॉसने घरातील सदस्यांना ५० लाखांची बचत करण्याचे टास्क दिले होते. सध्या बक्षिसाची रक्कम 21 लाख 80 हजार आहे. बजर टास्क जिंकणाऱ्या टीमची बक्षीस रक्कम पुन्हा ५० लाख असेल. त्यामुळे संघ एकच आहे. एका बाजूला शिव मंडळी आणि दुसऱ्या बाजूला प्रियांका-अर्चना आणि शालिन भानोत. बुधवारी झालेल्या टास्कमध्ये शिवच्या मंडळीचा पराभव झाला. बजरमधून उतरण्यासाठी त्यांनी तिघांवरही विविध प्रकारे हल्ला केला. शालीन-अर्चना आणि प्रियांका यांच्यावर शॅम्पू, सर्फपासून तयार केलेले पाणी ओतले, पण ते हलले नाहीत.

या टास्कनंतर आता आजच्या एपिसोडमध्ये या टास्कची पुनरावृत्ती होणार आहे. यावेळी शिव मंडळी बजर वाचवण्याची जबाबदारी घेणार आहेत. त्यावेळी सुंबुल तौकीर खान ही प्रियंका आणि अर्चना यांच्याकडे जाते आणि त्यांच्याशी टास्कबद्दल बोलतांना दिसते. ती त्यांना सांगते की जर शिव-निम्रित आणि स्टॅनने एकाच स्पर्धकावर तीन ते चार बादल्या पाणी फेकले असते तर नक्कीच स्पर्धकाचा हात बर्जरमधून काढला गेला असता. सुंबुलने आपल्याच संघाच्या विरोधात जाऊन विरोधी संघाला याची कल्पना दिली. तिच्या चाहत्यांना ही गोष्ट आवडली नाही.

मिनिट टास्कपासून स्टॅन-शिव आणि सुंबुलमध्ये थोडे बिनसल्यासारखे दिसत आहे. त्यांनी आपापसात बोलून सर्व काही जुळवून घेतले आहे, परंतु तरीही त्यांच्यात तणाव कायम असल्याचे दिसून येते. बिग बॉसने असेही सांगितले की शिव आणि स्टॅनने सुंबुलला खूप मनवले पण ती विक्टिम कार्ड खेळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.