“सरकारपर्यंत आवाज पोहचवण्यासाठी शिक्षकांना आंदोलन करावे लागते, याची खंत वाटते” – आ. सत्यजीत तांबे

जुनी पेन्शन योजना मिळावी यासाठी नागपूर येथील यशवंत स्टेडियममध्ये शिक्षकांचे आंदोलन सुरु आहे. 2005 पूर्वी सुरू झालेली ही योजना अजूनही काही शिक्षकांना लागू झालेली नाही. जुनी पेन्शन योजना मिळावी, यासाठी सुरु असलेल्या आंदोलनस्थळी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी भेट देऊन आंदोलकांना पाठिंबा दर्शविला आहे.

राज्यातील अनेक खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक शाळांचे अनके वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांचे निवदेन आ. सत्यजीत तांबे यांना दिले होते. यासह 30 विद्यार्थ्यांना एक शिक्षक या प्रमाणात प्राथमिक शाळेत शिक्षक निश्चिती मिळावी, निवृत्त कर्मचाऱ्याच्या जागी नवीन कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीस मान्यता मिळत नसल्यामुळे शाळांवर मोठा अन्याय होत आहे. ही पदे पूर्ववत मान्य करावीत. तसेच 150 विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांना स्वतंत्र मुख्याध्यापक पद देण्याचे मंजूर करावे, अशा विविध मागण्या हे शिक्षक व शिक्षकेत्तर करत आहेत.

राज्यातील सर्व शिक्षकांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे, ही मोठी खंत आहे, असे मत आ. सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केले. तसेच जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी माजी आ. डॉ. सुधीर तांबे यांनी देखील सातत्याने पाठपुरवा सुरू ठेवला असून त्यांनी हा मुद्दा सभागृहात मांडला होता. त्याप्रमाणेच आ. सत्यजीत तांबे देखील हा मुद्दा सभागृहात मांडून शिक्षकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.