सनीज वर्ल्डमध्ये अरुणाचलचे आमदार मोपी मिहू – निसर्ग, साहस आणि आदरातिथ्य अविस्मरणीय अनुभव!
पुणे – अरुणाचल प्रदेशमधील अनीनी मतदारसंघाचे आमदार श्री. मोपी मिहू आणि त्यांचे कुटुंबीयांनी सनीज वर्ल्ड, पुणे येथे भेट दिली आणि आमच्या खास मेजवानीचा मनमोकळा आनंद घेतला. त्यांच्या भेटीत स्वादिष्ट महाराष्ट्रीयन व आंतरराष्ट्रीय पाककृतींचा आस्वाद, निसर्गरम्य वातावरणातील विश्रांती, तसेच विविध साहसी आणि करमणुकीच्या साधनांचा अनुभव घेता आला.
सनीज वर्ल्ड हे केवळ एक रिसॉर्ट नसून, निसर्गाच्या सान्निध्यात उभारलेले एक अद्वितीय पर्यटन स्थळ आहे, जेथे प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना काही ना काही अनुभवायला मिळते. सनीज वर्ल्डच्या लक्झरी सुविधा, स्वच्छता, उत्कृष्ट आतिथ्य आणि ‘अतिथी देवो भव:’ या मूल्यांवर आधारित सेवा यामुळेच श्री. मिहू आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या भेटीला “स्मरणीय आणि उत्साही अनुभव” असे संबोधले.एडव्हेंचर झोन, वॉटर स्पोर्ट्स, नैसर्गिक ट्रेल्स, भव्य रेस्टॉरंट्स आणि शांतता देणारे हिरवेगर्द परिसर यामुळे सनीज वर्ल्ड पाहुण्यांना एका वेगळ्याच जगात घेऊन जाते.