सचिन सावंत यांचा काँग्रेस प्रवक्ते पदाचा राजीनामा
मुंबई | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या नव्या नियुक्त्यांनंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य पाहिला मिळत आहे. सचिन सावंत यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. थेट हायकमांडला पत्र लिहून सचिन सावंत यांनी प्रवक्तेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे. गेल्या दहा वर्षांपासून सचिन सावंत काँग्रेसच प्रवक्ते म्हणून काम पहात आहेत.
पक्षात मुख्य प्रवक्तेपद तयार करुन त्या पदावर सचिव सावंत यांना डावलून अतुल लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सचिन सावंत नाराज असल्याचं बोललं जात असून यातूनच त्यांनी राजीनामा दिला आहे.