शेळगाव गटातील विकासाची नवी दिशा — शरद रामदास पवार यांची लोकहितवादी कामगिरी
शेळगाव गटातील ग्रामविकासाला चालना देत नेते शरद रामदास पवार यांनी देवगाव बु. येथील अंबी–देवगाव रोडवरील नळी नदीच्या पुलावर स्वखर्चाने खरफाड व मुरूम टाकण्याच्या कामाला आज प्रत्यक्ष सुरुवात केली.
या कामामुळे देवगाव व परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि दळणवळण व्यवस्थित होणार आहे.
स्थानिकांच्या अनेक वर्षांच्या मागणीला त्वरित प्रतिसाद देत, कोणत्याही सरकारी निधीची वाट न पाहता पवारांनी हे काम हाती घेतले आहे. जनतेच्या गरजा ओळखून तत्परतेने काम करणारे नेतृत्व पवार यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले. या कामाचे स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून, त्यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
शरद रामदास पवार यांनी सांगितले की,
👉 “ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा भक्कम करणे आणि विकासाची कामे नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवणे हा आमचा निर्धार आहे. हे काम नियोजनबद्ध व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण केले जाईल.