वास्तुविशारद निसारभाई तांबोळी यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान
जुन्नर तालुका मुस्लिम समाज सेवा समिती आणि निसारभाई तांबोळी सत्कार समितीच्या वतीने दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन
आळेफाटा | पुणे येथील सुप्रसिद्ध वास्तुविशारद निसारभाई तांबोळी यांना त्यांनी समाजासाठी केलेल्या निस्वार्थी सेवा कार्याबद्दल सौभद्र कार्यालय आळेफाटा येथे जुन्नर तालुका मुस्लिम समाज सेवा समितीच्या वतीने समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी युवा नेते अमित बेनके, जुन्नर नगर परिषदेचे गटनेते फिरोज पठाण, मातोश्री मैमुंनीसा तांबोळी, उपसरपंच विजय कुऱ्हाडे, हाजी गुलामनबी शेख, नगरसेवक जमीर कागदी,. पुणे शहर तांबोळी जमातचे अध्यक्ष नजीरभाई धायरीवाले, मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कयूमभाई तांबोळी, प्रसिद्ध उद्योजक राजूभाई शेख,मुनीर तांबोळी, हाजी अनिस पटेल, मुफ्ती शमशुद्दिन कादरी, मौलाना सोहेलरझा खान, हाजी शफी मोमीन, हाजी इस्माइल खान, अकील शेख, मुस्लिम सेवा समितीचे अध्यक्ष सादिक आतार, उपाध्यक्ष हाजी समद इनामदार, रईस मणियार, सचिव मेहबूब काझी, मुबारक तांबोळी, मार्गदर्शक शकील तांबोळी, रऊफ खान, हाजीकदीर मोमिन, अकबर पठाण, मंनुभाई पिरजादे, रिजवान पटेल समितीतील सर्व सदस्य आणि नागरीक उपस्थित होते.
वास्तुविशारद निसार तांबोळी यांनी पुणे, नगर, सांगली, सातारा, कोल्हापूर या परिसरामध्ये निर्माण झालेल्या मस्जिद,दर्गा, इदगाह,शाळा इत्यादींच्या उभारणीसाठी कलात्मक अशा इमारत रचना देऊन आपल्या मार्गदर्शनाखाली उभारल्या आहेत. ही सर्व कामे त्यांनी निस्वार्थ आणि निशुल्क केली आहेत. निसारभाई तांबोळी यांच्या माध्यमातून समाजाला एक आदर्श मार्गदर्शक मिळाला आहे. नुकतेच शिरूर येथे नव्याने बांधलेल्या शिरूर नगर परिषदेच्या सुंदर इमारतीच्या निर्मिती बद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी सत्कारमूर्ती निसारभाई तांबोळी, युवानेते अमित बेनके, फिरोज पठाण, मुफ्ती शमसुद्दिन कादरी, मौलाना सोहेलरझा खान, कय्यूम तांबोळी, नजीरभाई धायरीवाले, मुनीरभाई तांबोळी, इरफान तांबोळी यांची भाषणे झाली. तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते मुस्लिम सेवा समितीचे कार्य पत्रक प्रकशित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुबारक तांबोळी व सूत्रसंचालन प्रा.मेहबूब काझी यांनी केले व आभार हाजी समदभाई इनामदार यांनी मानले.