लाखों तरुणांच्या दृष्टीने केलेल्या आमदार सत्यजीत तांबेच्या मागणीची गृहमंत्र्यांकडून तत्काळ दखल
पोलीस भरती मैदानी चाचणीस येणाऱ्या लाखो तरुणांना मिळणार मोफत दिलासा
नाशिक दि.२१ जून : राज्यातील तरुणाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे विधान परिषदेचे आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्यात सुरु असलेल्या पोलीस भरती संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र पत्र लिहिले होते. यामध्ये पावसाळा काळात पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीस उपस्थित राहणाऱ्या तरुण- तरुणींना योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. यावर बोलताना गृहमंत्री फडणवीस यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पावसाळा पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीस उपस्थित राहणाऱ्या तरुण- तरुणींना योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना गृह विभागच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
राज्यात १९ जूनपासून सार्वत्रक पोलीस भरती सुरू झालेली आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात १७ हजार ४७१ पदांसाठी ही पोलीस भरती प्रकिया पार पडत आहे. या भरती प्रकियेसाठी सध्या उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी पावसामुळे उमेदवारांच्या मैदानी चाचणीला अडचणी येत आहेत. पावसामुळे पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी मैदान सुस्थितीत राहत नाही. त्यामुळे त्याचा मैदानी चाचणीवर परिणाम होत असल्याचं काही उमेदवारांचं म्हणण आहे. याबाबत आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे
पुढे बोलताना गृहमंत्री फडणवीस ,म्हणाले की, राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे मात्र, ज्या ठिकाणी पावसामुळे व्यत्यय निर्माण झाला असेल त्या ठिकाणच्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी घेण्यासाठी पुढच्या तारखा देण्यात आलेल्या आहेत. मात्र, ज्या जिल्ह्यात पाऊस नाही तेथे भरती प्रक्रिया राबण्यात येत आहे. तसेच जे विद्यार्थी मैदानी चाचणीसाठी येत आहेत, त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासंदर्भात आम्ही सूचना केलेल्या आहेत” असेही ते म्हणाले.
आमदार सत्यजीत तांबे यांनी उठवला आवाज
राज्यातील तरुण- तरुणीचे प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेले आमदार सत्यजीत तांबे यांनी पावसाळ्यात होत असलेल्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीस उपस्थित राहणाऱ्या तरुणांना योग्य सुविधा मिळवून देण्यासाठी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते या पत्रात त्यांनी भरतीसाठी होणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला व यातून मार्ग काढण्याची विनंती गृहमंत्र्यांकडे केली होती.
यापूर्वी या तरुण-तरुणींना या प्रक्रिये दरम्यान उष्माघाताचा त्रास झाल्याचे आपण बघितले आहे. तसेच निवाऱ्याचा अभावी रस्त्याच्या कडेला झोपलेल्या या तरुणांना आपण नेहमी वर्तमानपत्रात व बातम्यांच्या माध्यमातून बघत असतो. हे विदारक चित्र बघून कुठेतरी मनाला वेदना होत असतात. सध्या राज्यात सर्वदूर पाऊस होत असून, पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. यंदाच्या मैदानी चाचणीस सुमारे 18 लाख तरुण-तरूणी बसले आहेत. या तरुणांना जर निवाऱ्याची व भोजनाची व्यवस्था नसेल तर त्यांना अधिक संकटांना तोंड द्यावे लागेल. आपले ध्येय गाठण्यासाठी आलेल्या या तरुण-तरूणींना सहन करावा लागणारा त्रास दुर्दैवी आहे.
या भरती प्रक्रिये दरम्यान आवश्यक त्या सुविधा मिळण्याच्या अनुषंगाने जर काही धोरणात्मक पाऊले उचलली गेली, तर त्यांना मोठा दिलासा मिळेल. महोदय राज्याच्या विविध भागांतून मोठ्या आशेने येणाऱ्या आणि वर्षानुवर्षे भरतीचा सराव करणाऱ्या या मुलांना भरतीच्या वेळी पुरेशा सुविधांअभावी त्रास सहन करावा लागत आहे. या गोष्टीची दखल घेऊन त्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.
महाराष्ट्रात आमदार सत्यजीत तांबे हे सातत्याने तरुणाच्या, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठवत असतात. त्यासाठी ते राज्यभर ‘जय हिंद’ चळवळ चालवत आहेत. युवकांना एकत्र करत त्यांच्या हाताला काम देत आहेत. नोकर भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सातत्याने विविध शिबिरांचे आयोजन करत असतात. शालेय समस्या असो किंवा नोकर भरती प्रत्येक ठिकाणी तरुणाच्या मदतीला आमदार तांबे धावून जात आहेत. त्यामुळेच तरुणांमध्ये आमदार सत्यजीत तांबे यांची क्रेझ पाहायला मिळत आहेत.