मुख्यमंत्र्यांनी माळशिरस च्या माजी आमदारांना भरवला पेढा, कारण आलं समोर

फडणवीस साहेबांकडून मा. आमदार सातपुते यांना कन्यारत्नप्राप्तीबद्दल शुभेच्छा

मुंबई, ११ सप्टेंबर :
माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे मा. आमदार रामभाऊ सातपुते यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. कन्यारत्नप्राप्तीचा आनंद वाटण्यासाठी आलेल्या या भेटीत साहेबांनी स्वतः मिठाई भरवून आमदार सातपुते यांचे अभिनंदन केले व नवजात कन्येला आशीर्वाद दिला.

देवेंद्र फडणवीस स्वतः एका मुलीचे वडील असल्याने, सहकाऱ्याच्या जीवनातील या क्षणाचे महत्त्व त्यांनी मनापासून जाणले. व्यस्त राजकीय घडामोडींमध्ये वेळ काढून दिलेल्या या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्येही आनंदाचे वातावरण पसरले.

घनिष्ठ नाते आणि राजकीय विश्वासाचा वारसा

रामभाऊ सातपुते व देवेंद्र फडणवीस यांचे संबंध हे केवळ राजकीय नसून कौटुंबिक आपुलकीचे आहेत. राम सातपुते विद्यार्थी चळवळीत काम करत असतानाच फडणवीस यांनी त्यांच्यातील नेतृत्वगुण ओळखले होते. त्यानंतर प्रत्येक राजकीय टप्प्यावर मग ते निवडणुकीतील उमेदवार निवडीचे वाद असो किंवा मारकडवाडी सारखी आंदोलने असोत, फडणवीस यांनी सातपुते यांच्या पाठीशी ठाम उभं राहून भक्कमपणे आधार दिला आहे.

माळशिरसच्या विकासासाठी भक्कम पाठबळ

विद्यमान आमदार उत्तमराव जानकर असतानाही माळशिरस मतदारसंघातील विविध प्रकल्पांसाठी सर्वाधिक निधी आणण्यात रामभाऊ सातपुते यशस्वी ठरत आहेत. या मागे फडणवीस साहेबांचा विश्वास आणि सातपुते यांची सातत्यपूर्ण धडपड आहे, अशी चर्चा स्थानिक पातळीवर रंगली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.