मा.नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकाराने मोफत आकाशकंदील कार्यशाळा!

दिवाळीचा आनंद चिमुकल्यांच्या हातांनी तयार केलेल्या आकाशकंदीलाने अधिक उजळतो! या पारंपरिक सणाला सर्जनशीलतेची नवी झळाळी देण्यासाठी सनी निम्हण यांच्या पुढाकाराने “मोफत आकाशकंदील कार्यशाळा” आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेत मुलांना स्वतःच्या हातांनी आकाशकंदील बनवण्याचा आनंद मिळणार आहे. विशेष म्हणजे, आवश्यक सर्व साहित्य आयोजकांकडून जागेवरच उपलब्ध करून दिले जाणार आहे.

📅 रविवार, 12 ऑक्टोबर 2025
📍 कै. इंदिरा गांधी प्राथमिक विद्यालय, औंध – सकाळी 10.00 वा.
📍 छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, बोपोडी – सायं. 4.00 वा.

सर्जनशीलतेला प्रोत्साहन देत आणि परंपरेला आधुनिकतेची जोड देत सनी निम्हण यांच्या या उपक्रमाचे औंध व बोपोडी परिसरात स्वागत होत आहे. दिवाळीच्या आनंदात मुलांचे योगदान वाढविण्यासाठी ही कार्यशाळा एक उत्तम संधी ठरणार आहे.

कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर संपर्क करा:
🌐 www.sunnynimhan.com

Leave A Reply

Your email address will not be published.