मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या हस्ते औंधगाव गुरुद्वाऱ्यात सौर प्रकल्पाचे उद्घाटन
औंधगाव येथील गुरुद्वाऱ्यात पर्यावरण रक्षणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, १० किलोवॅट क्षमतेचा सौर छतावरील प्रकल्प नुकताच कार्यान्वित करण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन भाजपचे माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
यावेळी बोलताना सनी विनायक निम्हण म्हणाले, “ही एक स्तुत्य आणि पर्यावरणपूरक पुढाकार आहे. सौर ऊर्जेसारख्या पर्यायी स्रोतांचा वापर केल्यास ऊर्जा बचतीसोबतच पर्यावरण रक्षणालाही मोठा हातभार लागतो. गुरुद्वाऱ्याने समाजासमोर एक सकारात्मक उदाहरण मांडले आहे.”
या कार्यक्रमाला गुरुद्वाराचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैसाखी उत्सवातही उत्स्फूर्त सहभाग:
सौर प्रकल्प उद्घाटनानंतर सनी विनायक निम्हण यांनी औंधगावातील बैसाखी उत्सवातही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पारंपरिक पंजाबी वातावरण, रंगीत वेशभूषा, गीत-संगीत आणि स्नेहाचा उत्सव अनुभवत त्यांनी उपस्थित नागरिकांना बैसाखीच्या शुभेच्छा दिल्या.
“बैसाखी हा आनंद आणि एकतेचा सण आहे. विविध संस्कृती आणि परंपरा एकत्र येत असताना समाजामध्ये सौहार्द वाढीस लागतो,” असे त्यांनी नमूद केले.