मा.आ. राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूजमध्ये सामाजिक उपक्रमांचे आयोजन
अकलूज येथील भाजपा शाखेने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, मिष्ठान्न वाटपासह आयोजित केले विविध समाजोपयोगी कार्यक्रम
१२ मार्च, अकलूज: भारतीय जनता पार्टी (भाजपा) अकलूज शहरातील विविध शाखांनी भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माजी आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित केले. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, मिष्ठान्न वाटप आणि इतर सामाजिक उपक्रमांचा समावेश होता. या कार्यक्रमातून समाजसेवेचा एक नवीन आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न अकलूज येथील भारतीय जनता पक्षाच्या विविध शाखांकडून करण्यात आला.
मा. राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा अकलूज शाखेने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेली साहित्ये पुरवण्यात आली. याशिवाय, मिष्ठान्न वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन युवा नेता महेश शिंदे, गांधी चौक शाखाध्यक्ष संतोष वाघमोडे, नवीन बाजार तळ शाखाध्यक्ष भीमराव कांबळे, महाराणा प्रताप चौक शाखाध्यक्ष शंकर मास्के आणि सचिव अण्णासाहेब काळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची संधी मिळावी, या भावनेतून भाजपा कार्यकर्त्यांनी समाजसेवेचा एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.
दरम्यान माजी आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त राजकारणातील वरिष्ठ मंत्री ,खासदार, आमदार तसेच समाजातील विविध मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून आणि फोनद्वारे शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनीही फोनद्वारे माजी आमदार राम सातपुते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात भाजपा युवा नेते सुजय भैय्या माने पाटील आणि अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी भाजपाचे कार्यकर्ते प्रदीप वाघमारे, हर्षद कांबळे, अशोक कांबळे, दत्ता जगताप, अमोल माने आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते