माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकाराने आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे शिवधनुष्य तब्बल 1104 रक्तदात्यांनी पेलले!
दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे 110 4 रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग!
पुणे, पाषाण – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने सोमेश्वरवाडी (पाषाण) येथील श्री सोमेश्वर मंदिर प्रांगणात सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकाराने व सोमेश्वर देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. मा. चंद्रकांतदादा पाटील (मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
या शिबिराला पाषाण परिसरातील नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला असून एकूण 1104 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून शिवरायांच्या विचारांना कृतीतून उजाळा दिला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘रयतेसाठी झटणाऱ्या राजे’ या विचारातून प्रेरणा घेत, श्री सोमेश्वर देवस्थान व सनी निम्हण यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यंदाचे शिबिरही सामाजिक एकतेचे आणि सेवा भावनेचे प्रतीक ठरले.
या उपक्रमातून मिळणाऱ्या रक्ताचा उपयोग गरजू रुग्णांसाठी होणार असून, “स्वराज्याचा सन्मान राखुया चला रक्तदान करूया” या भावनेने नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
शिबिरात विविध स्वयंसेवी संस्था, डॉक्टर्स, आणि सेवाभावी कार्यकर्त्यांनीही सहभाग घेत उत्सवाचे रूपांतर समाजसेवेत केले.
यावेळी श्री. अमोल बालवाडकर, महापौर श्री. दत्तात्रय गायकवाड, श्री. वसंतराव जुनवणे, श्री. शहाजी रनावडे, श्री. राहुल कोकाटे, श्री. लहू बालवडकर, श्री. गणेश कळमकर, श्री. सुहास निम्हण, सोमेश्वर देवस्थानचे अध्यक्ष श्री. पोपटराव जाधव, श्री. खंडूशेठ अरगडे, श्री. ज्ञानेश्वर पारखे, श्री. मनोहर अरगडे, श्री. शांताराम महाराज निम्हण, पांडुरंग अप्पा दातार, भारत जोरे यांच्यासह देवस्थानचे स्वयंसेवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.