महाशिवरात्रीपूर्वी श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिरात स्वच्छता अभियान- नगरसेवक सनी निम्हण
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी स्वच्छ व पवित्र वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर परिसरात विशेष स्वच्छता व साफसफाई अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे अभियान रविवार, दि. ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर, पुणे येथे पार पडणार आहे. या उपक्रमाचे आयोजन श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या स्वच्छता अभियानात नागरिकांनी, शिवभक्तांनी तसेच स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. सनी विनायक निम्हण (विश्वस्त, श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट तसेच नगरसेवक, पुणे महानगरपालिका) यांनी केले आहे.
महाशिवरात्रीसाठी येणाऱ्या भाविकांना स्वच्छ, सुरक्षित व भक्तीमय वातावरण उपलब्ध व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.