महाराष्ट्रातील तलाठी भरती परीक्षेतील घोटाळ्यांबाबत कठोर कायदे करण्याची आ. सत्यजीत तांबे यांची मागणी !
राज्य शासनाने घेतलेल्या तलाठी भरती प्रक्रिये दरम्यान झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी केली. राज्यातील लाखो तरुणांनी या भरती प्रक्रियेत सहभाग घेतला होता. राज्यभरात लागलेल्या तलाठी भरती परीक्षेच्या निकालात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलांवर हा अन्याय असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. जोपर्यंत चौकशी समितीचा अहवाल सादर केला जात नाही, तोपर्यंत या परीक्षेचा निकाल लावण्यात येऊ नये. जेणेकरून प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या माझ्या युवक मित्रांवर अन्याय होणार नाही. याची काळजी सरकारने घ्यावी. अशीही मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी केली.
राज्य शासनाने अनेक प्रयत्न करूनही यामधील घोटाळे बंद व्हायचे नाव घेत नसेल तर पेपरफुटी व हे घोटाळे कायमचे बंद करण्यासाठी कठोर कायदा आता व्हायला हवा, अशी ठाम मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी केली.