महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनी छगन भुजबळांकडून नाशकातील फुले स्मारकात अभिवादन

महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनी छगन भुजबळांकडून नाशकातील फुले स्मारकात अभिवादन

नाशिक,दि.२८ नोव्हेंबर :- क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या १३४ व्या स्मृती दिनानिमित्त मुंबई नाका येथे फुले स्मारकात मंत्री छगन भुजबळ यांनी क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.

यावेळी आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, डॉ.शेफाली भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव, आरपीआय आठवले गट जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष एड रवींद्र पगार, विष्णुपंत म्हैसधूने, आनंद सोनवणे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब कर्डक, गोरख बोडके, समता परिषदेचे प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर,युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे,युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, समता परीषद जिल्हाध्यक्ष प्रा.ज्ञानेश्वर दराडे, डॉ.योगेश गोसावी,महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्षा
कविता कर्डक, माजी नगरसेविका सुनीता निमसे, समता परिषदेच्या जिल्हाध्यक्षा पूजा आहेर, शहराध्यक्षा आशा भंदुरे, संजय खैरनार, बॉबी काळे, अमोल नाईक, अमर वझरे, किशोरी खैरनार, मीनाक्षी काकळीज, चिन्मय गाढे, जीवन रायते, संदीप बत्तासे, योगेश कमोद, मोहन माळी यांच्यासह विविध पक्षांचे व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी फुले दाम्पत्याची वेशभूषा साकार करत अभिवादन कार्यक्रमात सहभाग नोंदविला. तसेच या प्रसंगी उपस्थितांनी जय ज्योती जय क्रांतीचे नारे दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.