मंत्री छगन भुजबळ यांनी कुटुंबियांसह बजावला मतदानाचा हक्क

नाशिक दि.२० मे : लोकसभेच्या ५ व्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. महाराष्ट्रातील निवडणुकीचा हा शेवटचा टप्पा होता. यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर या प्रमुख मतदारसंघांसह राज्यातील बहुचर्चित नाशिक मतदारसंघ आणि दिंडोरी मतदारसंघाचा समावेश होता. आज या सर्व ठिकाणी मतदान पार पडले. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक शहरातील मॉर्डन स्कूल, सिडको या मतदान केंद्रावर आपल्या कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी देशाच्या विकासासाठी नागरिकांना १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, डॉ.शेफाली भुजबळ, समीर भुजबळ यांच्या मातोश्री हिराबाई भुजबळ यांच्यासह कुटुंबातील सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

Leave A Reply

Your email address will not be published.