भाजप नेते, मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ₹5,55,555/- ची मदत.
पुणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमेश्वर फाउंडेशन आणि सनीज फूड्स यांच्या वतीने दिवाळी फराळ विक्रीचा उपक्रम राबवण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार फराळ सवलतीच्या दरात उपलब्ध करून देत “ना नफा, ना तोटा” या तत्त्वावर प्रत्येकाची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करण्यात येतो.
मात्र यावर्षी महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि महापूरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या या संकटाच्या काळात मदतीचा हात देण्यासाठी या फराळ विक्रीतून जमा झालेली रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा संकल्प मा.नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी केला होता.
या उपक्रमाला पुणेकर नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आणि संकल्प प्रत्यक्षात उतरला! मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांना ख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ₹5,55,555/- चा धनादेश सनी निम्हण यांनी सुपूर्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अभिनव उपक्रमाचे मनापासून कौतुक करत सोमेश्वर फाउंडेशनच्या समाजोपयोगी कार्याला शुभेच्छा दिल्या.