भाजपाचे रणनीतीकारच म्हणतात डॉ अमोल कोल्हे होणार विजयी

पुणे, दि.११ एप्रिल : देशात सध्या सुरु असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पर्शवभूमीवर भाजपाचे राजकीय रणनीतीकार प्रतीक वर्मा यांची ट्विटर व इंस्टाग्राम वरील डॉ अमोल कोल्हे यांच्या विषयीची एक पोस्ट खूप मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.

रणनितीकार प्रतीक वर्मा लिहितात की शिरूरमध्ये १३ मे ला होणाऱ्या लढतीने संपूर्ण देशाचे सर्वात जास्त लक्ष वेधून घेतले आहे . शिरूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे आहेत. डॉ अमोल कोल्हे यांनी मागील ५ वर्षात शिरूरच्या मुद्द्यांवर, प्रश्नांवर ज्या पद्धतीने संसदेत आवाज उठवला, लोकांमध्ये गेले ,समाज माध्यमांचा प्रभावी वापर करत त्यांनी त्यांचं काम जनतेपर्यंत पोहोचवलं. संसदेतील त्यांच्या भाषण कौशल्यामुळे अमोल कोल्हे हे नाव शिरूर मतदारसंघातील प्रत्येक घराघरात घेतले जाऊ लागले. आपल्या कामगिरीने डॉ अमोल कोल्हे यांनी शिरूर मतदारसंघाला आपला गड बनवला आहे. त्यांच्या याच कामाच्या पद्धतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा कौतुक केले आहे.

प्रतीक वर्मा पुढे लिहितात की राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातील फुटीनंतर डॉ अमोल कोल्हे हे त्यांच्या विचारांवर ठाम राहत शरद पवार यांच्या सोबत राहिले त्यामुळे त्यांची लोकप्रियता इतकी वाढली कि महायुती ला त्यांच्याविरुद्ध उमेदवार सुद्धा मिळत नव्हता. त्यामुळे त्यांना नाईलाजाने शिवाजी आढळराव यांना तिकीट द्यावे लागले ज्यांनी स्वतः ३ वेळा खासदार असताना शिरूर मतदारसंघाचा विकास करण्यापेक्षा स्वतः चा विकास करण्यावर भर दिला. त्यामुळे भाजपाचा शिरूर मतदारसंघातील जो मतदार आहे त्यांनाही डॉ अमोल कोल्हे हेच शिरूरसाठी सगळ्यात जास्त सक्षम उमेदवार वाटतात. मतदानाला अवघे २ दिवस बाकी असताना आताच संपूर्ण शिरूर मतदारसंघात डॉ अमोल कोल्हेच हे पुन्हा एकदा खासदार होणार अशी जनभावना दिसून येत आहे.

शिरूर मतदारसंघातील भाजपाचे कार्यकर्ते ,नेते यांच्यामध्ये सुद्धा शिवाजी आढळराव यांच्याविषयी प्रचंड अशी नाराजी असल्याचं बोललं जात आहे. आढळराव हे अकार्यक्षम व अलोकप्रिय व थकलेले उमेदवार आहेत असं महायुतीच्या खुद्द नेत्यांनाच वाटत आहे. शिवाजी आढळरावांविषयी शिरूर मतदारसंघात असलेल्या नाराजीमुळे खुद्द भाजपा महायुतीचेच काही नेते हेच छुप्या पद्धतीने डॉ अमोल कोल्हे यांचं काम करत आहेत.

शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या पेशाने डॉक्टर ,कलाकार,समाज सेवक असलेले डॉ अमोल कोल्हे हे त्यांच्या कामगिरीने एक परिपूर्ण राजकारणी बनले आहेत . एखादा आदर्श खासदार कसा असावा हे डॉ अमोल कोल्हे यांच्या कडे पाहुन समजते. शिरूर मतदारसंघाची होणारी लोकसभेची ही निवडणूक संपूर्ण देशात एक उदाहरण असेल ज्यात पैसा, सत्तेची ताकत, संघटन कमतरता याशिवाय सुद्धा डॉ अमोल कोल्हे हे ह्या लढाईमध्ये विजयी होतील.

 

Leave A Reply

Your email address will not be published.