मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत भरवस वाहेगाव येथे अखंड हरीनाम सप्ताह व कृषी प्रदर्शनाची सांगता

 

निफाड :– जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी ३७५ वा सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरीनाम सप्ताह व कृषी प्रदर्शनाचा सांगता सोहळा आज भरवस वाहेगाव येथे आज पार पडला. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील या सोहळ्याला उपस्थिती लावली आणि या ठिकाणी रंगलेल्या भजन-कीर्तनाचा आनंद घेतला.

या सोहळ्यात मंत्री छगन भुजबळ यांनी ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम यांना पुष्पहार घालून त्यांचा सत्कार केला. तसेच यावेळी वारकरी संप्रदायाच्या वतीने मंत्री भुजबळ यांचा देखील सत्कार करण्यात आला. संत तुकाराम महाराजांचे वंशज अनिकेत महाराज, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आ. आशुतोष काळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

फक्त निफाडच नाही, तर नाशिक जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातून या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केली होती. भव्य मंडपात या ठिकाणी कीर्तन, पारायण आणि भजन यांचे आयोजन करण्यात आले होते. तर रोजी सुमारे ५० हजार भाविकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी लासलगाव बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप, भाऊसाहेब भवर, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, येवला बाजार समितीचे सभापती किसनराव धनगे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, दत्तात्रेय रायते, दत्तात्रय डुकरे, कैलास सोनवणे, बाळासाहेब मुद्गुल, विनोद जोशी, मंगेश गवळी, पांडुरंग राऊत, माधव जगताप, संतोष खैरनार, सुनील पैठणकर, सचिन कळमकर, भाऊसाहेब धनवटे, गोटू मांजरे, गणेश गवळी, थोरात यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.