बोपोडीत नारीशक्तीचा सन्मान , सनी विनायक निम्हण यांच्यासोबत महिलांचा विश्वास, विकासाची दिशा
बोपोडी येथील शिव संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित “सन्मान नारीशक्तीचा – खेळ रंगला पैठणीचा” हा उपक्रम केवळ कार्यक्रम न राहता, महिलांचा विश्वास आणि लोकाभिमुख नेतृत्वाचा ठोस संदेश देणारा ठरला.
या सोहळ्यास भाजप नेते सनी विनायक निम्हण प्रमुख उपस्थित होते. त्यांनी माता-भगिनींचा सन्मान करताना सांगितले की,
“महिला सुरक्षित, सशक्त आणि आनंदी असतील, तरच औंध-बोपोडीचा खरा विकास शक्य आहे. महिला सक्षमीकरण, सुरक्षित परिसर आणि सर्वांगीण विकास हीच माझी राजकीय नव्हे, तर सामाजिक जबाबदारी आहे.”
महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि भरभरून मिळालेला प्रतिसाद हा सनी निम्हण यांच्या कार्यशैलीवरील विश्वासाचा कौल असल्याचे यावेळी दिसून आले. केवळ आश्वासनांपुरते नव्हे, तर कृतीतून नेतृत्व दाखवणारे, नारीशक्तीचा सन्मान करणारे आणि प्रत्येक कुटुंबाशी नातं जोडणारे नेतृत्व म्हणून सनी विनायक निम्हण औंध-बोपोडीच्या जनतेच्या पसंतीस उतरले आहेत, अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.