पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या मुलीचे यश; मिळवला IIT मध्ये प्रवेश!!!
असं म्हटलं जाते की एखादी व्यक्ती त्याच्या मेहनतीने कोणतेही पद मिळवू शकते. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या व्यक्तीच्या मुलीने कृतीतून हे सिद्ध केले आहे. पेट्रोल पंप कस्टमर अटेंडंटची मुलगी आर्या हिने तिच्या मेहनत आणि समर्पणाच्या बळावर आयआयटी कानपूर मध्ये प्रवेश मिळवला आहे.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड चे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य यांनी ही माहिती दिली. आपल्या ट्विटरवर फोटो शेअर करत त्यांनी लिहिले आहे की, ‘इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या राजगोपालन यांची मुलगी आर्या हिची प्रेरणादायी कथा मी शेअर करत आहे. आर्याने आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश मिळवला याचा आम्हांलाअभिमान वाटला आहे. आर्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा.