पुण्यात लोकसभेचे मतदान संपताच सनी निम्हण यांच्या नावाची चर्चा

शहरात झळकावले मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे फ्लेक्स

पुणे : निवडणुकीचा प्रचार सुरु असताना विजयाचा दावा सर्वच उमेदवार करत असतात. पण मतदान संपल्यावर हे उमेदवार काय म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं असतं. पुण्यातील कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेगकर यांनी आपण पन्नास हजारांच्या आसपासच्या मताधिक्यानी निवडून येईन असा दावा केला आहे. त्याचबरोबर भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोथरुडमधून आपल्याला सर्वाधिक मताधिक्य मिळेल असा दावा केलाय. तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील मुरलीधर मोहळांच्या विजयाचे अभिनंदन करणारे फ्लेक्स लावण्यात आलेत.

पुणे शहरातील माजी नगरसेवक सनी निम्हण हे कायम हटके प्रयोग करत प्रसिद्धी झोतात असतात. त्यांनी ऑगस्ट महिन्यात कार्यसम्राट आमदार स्व. विनायक आबा निम्हण यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सर्वात मोठे महाआरोग्य शिबीर भरवले होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्ष नेत्यांनी सनी निम्हण यांचे कौतुक केले होते. स्वत: च्या वाढदिवसानिमित्त त्यांनी विविध क्रीडा स्पर्धांचा भरणा असलेल्या सुपर सनीज वीक देखील आयोजन केले होते. या माध्यमातून तरुणांच्या कला गुणांना वाव देण्याचा प्रयत्न ते करत असतात.

विधानपरिषद निवडणुकीच्या वेळी देखील त्यांनी निकाला अगोदरच नाशिक पदवीधर मतदारसंघातून उभे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या विजयाचे फ्लेक्स लावत असेच प्रसिद्धी झोतात आले होते. निकालानंतर सत्यजीत तांबे विजयी देखील झाले होते. यंदा देखील मुरलीधर मोहोळ यांचे फ्लेक्स झळकल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करताना दिसून येत आहेत.

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान पार पडलं असून 4 जून रोजी त्याचा निकाल लागेल. पण त्या आधीच काँग्रेस आणि भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडून विजयाचा दावा केला जात आहे. आता या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी त्या पुढेही जात थेट आपल्या नेत्यांचे भावी खासदार असं होर्डिंग लावल्याचं दिसतंय.

भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचे भावी खासदार या आशयाचे बॅनर्स पुण्यात झळकताना दिसत आहेत. त्या माध्यमातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी निकालाआधीच सेलिब्रेशन सुरू केल्याचं दिसतंय.

Leave A Reply

Your email address will not be published.