पुण्यातील अखाद्य बर्फ वापराविरोधात पावले उचला- सनी निम्हण यांची मागणी!

माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी शहरात सर्रास विकल्या जात असलेल्या अखाद्य बर्फाच्या विक्रीवर बंदी घालणे नितांत गरजेचे असल्याचे सांगितले.

पुणे, 24 मार्च : उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे रस्त्यावरील किंवा बाहेरील थंड पेय पिण्याचे, थंड खाद्य पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढत आहे. उन्हाच्या वाढत्या काहिलीमुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच थंड पेय व पदार्थ सेवन करण्याची इच्छा होतेय. परंतु पुणे शहरात ही थंड पेयं तयार करताना बहुतांश ठिकाणी त्यात मिसळले जाणारे बर्फ मात्र अखाद्य स्वरूपाचे असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.

यावरून माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी याविरोधात आवाज उठवला असून अशा प्रकारे अखाद्य बर्फ वापरून खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या आणि अप्रत्यक्षपणे नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. आरोग्याच्या दृष्टीने हे नक्कीच घातक असून यापासून पुणेकरांचा जीव वाचविण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची नितांत गरज असल्याचे नमूद केले!

थंड पेय विक्रेते व नागरिकांना आवाहन:

यानिमित्ताने त्यांनी शहरातील थंड पेय विक्रेत्यांना अशा प्रकारचे अखाद्य बर्फ आपल्या कोणत्याही पदार्थांमध्ये न वापरण्याविषयी आवाहन देखील केले आहे. तसेच नागरिकांनी देखील सावध राहून योग्य खबरदारी घ्यावी आणि अशा प्रकारचे खाद्यपदार्थ खाणे टाळावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.