पत्नीच्या वाढदिवशी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे नेटकऱ्यांकडून कौतुक

पत्नीच्या वाढदिवशी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे नेटकऱ्यांकडून कौतुक

पुणे | पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी काल फेसबुकवर काही कौटुंबिक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये डॉ.देशमुख हे त्यांच्या पत्नी विजया देशमुख यांना ओवाळताना दिसत आहेत. विजया देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डॉ.देशमुख यांनी त्यांचे औक्षण केले. त्याचप्रमाणे विजया देशमुख यांना लिहिलेले एक पत्रही डॉ.देशमुख यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे.

या पत्रातून पत्नी सोबतच्या हळव्या नात्याचा उल्लेख करत त्यांचे कौतुक केलं आहे. डॉ.देशमुख यांनी केलेलं पत्नीचं औक्षण नेटकऱ्यांना चांगलंच भावलं आहे विविध स्तरातून डॉ.देशमुख यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.