नाशकातील नवनिर्मित बालाजी मंदिरास मंत्री छगन भुजबळ यांची भेट व दर्शन

नाशिक, दि.२८ एप्रिल : शहरातील नाशिक रोड येथे नव्याने साकारण्यात आलेल्या बालाजी मंदिरास आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांनी श्री बालाजी भगवान यांचे मनोभावे दर्शन घेतले व नाशिकच्या विकासासाठी व नाशिककरांच्या कल्याणाची प्रार्थना केली.

बालाजी व्यंकटेश्वराची भक्ती व प्रचार करणाऱ्या बालाजी सोशल फाऊंडेशनच्या वतीने नाशिक रोड येथे श्री बालाजी देवस्थान मंदिर साकारण्यात आले आहे. नव्याने निर्माण झालेल्या या मंदिरास मंत्री भुजबळ यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी आज बालाजी दर्शनाचा सुंदर योग जुळून आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच मंदिर परिसराची पाहणी देखील करत मंदिराच्या सुबक कलाकुसरीचे त्यांनी भरभरून कौतुक केले. याप्रसंगी त्यांनी फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, बालाजी सोशल फाउंडेशनचे कैलास मुदलियार, गिरीश मुदलीयार, समाधान जेजुरकर, अमर वझरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.