नगरसेवक सनी विनायक निम्हण यांचा कौतुकास्पद उपक्रम : औंध–बोपोडीत “महापुरुषांना स्वच्छांजली” स्वच्छता मोहीम

महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घेऊन स्वच्छतेचा संकल्प प्रत्यक्षात उतरवत, औंध–बोपोडी प्रभागात शिवजयंती ते भीमजयंती (१९ फेब्रुवारी ते १४ एप्रिल) या कालावधीत “महापुरुषांना स्वच्छांजली” ही विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी होत आहे.

या अभिनव उपक्रमामार्फत नागरिकांचा थेट सहभाग वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. प्रभागातील स्वच्छतेची गरज असलेल्या जागांचा फोटो व लोकेशन नागरिकांनी QR कोड स्कॅन करून पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त माहितीच्या आधारे तातडीने स्वच्छता करून प्रभाग अधिक स्वच्छ व सुंदर बनवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

हा सर्व स्तुत्य उपक्रम औंध–बोपोडीचे नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकारातून राबवला जात असून, त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे स्वच्छतेसारख्या महत्त्वाच्या विषयाला लोकचळवळीचे स्वरूप मिळत आहे. महापुरुषांच्या स्मृतींना स्वच्छतेच्या माध्यमातून अभिवादन करण्याची ही संकल्पना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुकास पात्र ठरत आहे.

औंध–बोपोडी प्रभाग स्वच्छ, सुंदर आणि आदर्श बनवण्याच्या दिशेने नगरसेवक सनी निम्हण यांचा हा प्रयत्न नक्कीच प्रेरणादायी असून, इतर प्रभागांसाठीही तो मार्गदर्शक ठरेल, असे नागरिकांमध्ये मत व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.