धर्मवीर संभाजी पतसंस्थेला उत्कृष्ट ग्रामीण पतसंस्था पुरस्कार

नारायणगाव | पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या धर्मवीर संभाजी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला दैनिक नवभारत वृत्तसमूहाच्या वतीने यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आयोजित केलेल्या राज्य सहकार परिषदेत ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रामीण पतसंस्था पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आणि नवभारत वृत्तसमूहाचे मालक निमिष माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.