दिवाळीत फराळाची चव आणि मदतीचा हात : मा.नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकारातून ‘सनीज दिवाळी फराळ किट’ उपक्रम
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सनीज फूड्स आणि सोमेश्वर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक अभिनव आणि सामाजिक जाणीवेने भरलेला उपक्रम राबवण्यात येत आहे. सनी निम्हण यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमाअंतर्गत ‘सनीज दिवाळी फराळ किट’ फक्त ₹६०० मध्ये पुणेकरांना उपलब्ध होणार असून, यामध्ये पारंपरिक पाच दिवाळी पदार्थ सुमारे ४ किलो वजनात दिले जाणार आहेत.
या किटची खासियत म्हणजे केवळ दिवाळीच्या स्वादाचा आनंदच नव्हे, तर पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्याची संधीही या माध्यमातून मिळणार आहे. या किटच्या प्रत्येक विक्रीतून मिळणारी रक्कम थेट मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करून पूरग्रस्त भागात पाठवली जाणार आहे.
सनी निम्हण यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, “दिवाळी हा एक सण आहे, जो आनंद वाटण्याचा असतो. या उपक्रमाद्वारे आम्ही नागरिकांना एकाच वेळी पारंपरिक फराळाची चव आणि समाजासाठी काहीतरी करण्याची संधी देत आहोत.”
दि. १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी पुण्यातील २० विक्री केंद्रांवर हे किट उपलब्ध असणार आहेत. नागरिकांनी आपल्या जवळच्या केंद्रावर जाऊन हे किट खरेदी करावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: ७४४७७७३५५५
वेबसाइट: www.sunnysfoods.com