छगन भुजबळांकडून महात्मा फुलेंना जयंतीनिमित्त आदरांजली

नाशिकच्या भुजबळ फार्म येथे अभिवादन कार्यक्रम

नाशिक- दि. ११ समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथील कार्यालयात महात्मा फुलेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मंत्री भुजबळ यांनी महिला, वंचित घटक, शेतकरी या घटकांच्या शिक्षणासह इतर हक्कांसाठी महात्मा फुले यांनी केलेल्या थोर कार्याबद्दल आपल्या मनोगतातून वंदन केले.

यावेळी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, विष्णुपंत म्हैसधूने, समाधान जेजुरकर, योगेश निसाळ, योगिता आहेर, आशा भंदूरे, पुजा आहेर, संजय खैरनार, नाना पवार, बाळासाहेब गीते, नितीन चांद्रमोरे, मकरंद सोमवंशी, पुष्पा राठोड, आकाश कदम, प्रसाद सोनवणे, चिन्मय गाढे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.