चाकण-शिक्रापूर हायवेवरील अपघातानंतर सुधीर मुंगसे यांची ही मागणी!
अपघात नियंत्रणासाठी एलिव्हेटेड कॉरीडॉरची आवश्यक!
पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा तळेगाव चा शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग असेल इथे होणारी ट्रॅफिक हा रोजचा संघर्ष झाला आहे. रोजच्या या संघर्षात अनेक लोकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. “अपघात” तर आता लोकांसाठी एक साधारण गोष्ट झाली आहे.
काही दिवसांपूर्वी चाकण शिक्रापूर रोडवर एका ट्रकचालकाने असंख्य गाड्यांचा चुराडा केला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी यामध्ये झाली नाही. हा अपघात होताच खेड-आळंदी विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक असलेले उमेदवार सुधीर मुंगसे यांनी नाशिक फाटा ते खेड आणि तळेगाव चाकण शिक्रापूर येथे केंद्र सरकारकडून होणाऱ्या एलिव्हेटेड कॉरीडॉरची मागणी लावून धरली आहे. हा एलीव्हेटेड कॉरीडॉर झाल्यास या भागातील जनतेची ट्रॅफिकची समस्या काय सुटेल आणि रोजच्या अपघातांचे प्रमाणही नक्कीच कमी होईल.
शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहेत, पण आता हे कॉरीडॉर प्रत्यक्षात कधी होतील, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.