औंध–बोपोडी प्रभागाच्या विकासाला गती; सनी निम्हण यांच्या हस्ते २ कोटींच्या कामांचे भूमिपूजन
औंध–बोपोडी प्रभागातील औंध पोलीस वर्कशॉप लाइन येथील १२ मीटर डी.पी. रस्ता (फुटपाथसह) तसेच पोलीस वर्कशॉप रोड येथील पदपथ विकास कामांचे भूमिपूजन आज नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले.
या विकासकामांसाठी सुमारे २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या कामांमुळे प्रभागातील नागरिकांना अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि सुटसुटीत वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहे. तसेच पदपथांच्या विकासामुळे पादचाऱ्यांना सुरक्षित मार्ग मिळणार असून, प्रभागाच्या विकासाला आणि सौंदर्यवृद्धीला मोठी चालना मिळेल, असा विश्वास यावेळी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी व्यक्त केला. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या भूमिपूजन प्रसंगी नगरसेविका सौ. भक्तीताई गायकवाड, श्री. वसंतराव जुनावणे, श्री. योगेश जुनावणे, श्री. राहुल गायकवाड, श्री. गणेश शेलार, श्री. सौरभ कुंडलिक यांच्यासह इतर मान्यवर व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.