एनसीबी प्रमुख वानखेडे यांचे हेरगिरीचे आरोप गृहमंत्र्यांनी फेटाळले

वानखेडे यांचे हेरगिरीचे आरोप गृहमंत्र्यांनी फेटाळले

मुंबई | नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दोन पोलिसांवर पाठलाग करणे आणि त्यांचा फोन टॅप केल्याचा आरोप केला आहे. याबाबत त्यांनी महाराष्ट्राच्या डीजीपीकडे तक्रारही केली आहे. आता या आरोपांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही सूचना पोलिसांना देण्यात आलेल्या नाहीत असे पाटील म्हणाले आहेत.

समीर वानखेडे यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, ‘मला वाटत नाही की मुंबई पोलिसांचे अधिकारी त्यांच्यावर पाळत ठेवतात. अशा कोणत्याही सूचना कुणालाच देण्यता आलेल्या नाहीत’ तसेच, त्यांच्या आरोपांविषयी आपल्याला जास्त काही माहिती नसल्याचेही देखील पाटील म्हणाले आहेत. याविषयाची अतिरिक्त माहिती घेऊन मी त्यावर बोलेल असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत.

समीर वानखेडे यांनी दोन पोलिसांवर पाठलाग करणे आणि त्यांचा फोन टॅप केल्याचा आरोप केला आहे. याविषयी त्यांनी महाराष्ट्राच्या डीजीपीकडे तक्रारही केली आहे. मात्र, याला वानखेडे यांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही. वानखेडे यांनी पुरावा म्हणून सीसीटीव्ही फुटेजही सादर केले आहे. मुंबई एनसीबी टीमच्या इतर अधिकाऱ्यांनाही ‘ट्रॅक’ केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओशिवरा पोलिसांचे एक पथक स्मशानभूमीत गेले आहे आणि तेथून एक सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. वानखेडे यांच्या आईचे 2015 मध्ये निधन झाले आणि तेव्हापासून ते जवळजवळ दररोज स्मशानभूमीला भेट देतात. यानंतर त्यांना पाठलाग केला जात असल्याचा संशय आला.

Leave A Reply

Your email address will not be published.